अवैध सावकारीप्रकरणी भडकुंभा येथे एका जणाविरूद्ध कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 06:05 PM2018-07-25T18:05:35+5:302018-07-25T18:06:21+5:30
मंगरूळपीर - मंगरूळपीर तालुक्यातील भडकुंभा येथील सुखदेव चरणसिंग राठोड हे अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याची तक्रार चार जणांनी केली असता, मंगरूळपीरच्या सहायक निबंधकांनी बुधवारी तपासणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर - मंगरूळपीर तालुक्यातील भडकुंभा येथील सुखदेव चरणसिंग राठोड हे अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याची तक्रार चार जणांनी केली असता, मंगरूळपीरच्या सहायक निबंधकांनी बुधवारी तपासणी केली. यावेळी काही शेतकºयांच्या जमिनीची कागदपत्रे तसेच आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आल्याने पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी म ाहिती सहाय्यक निबंधक पी.एन. गुल्हाने यांनी दिली.
मंगरूळपीर तालुक्यातील भडकुंभा येथील इंदल मंगूसिंग राठोड व अन्य चार जणांनी सुखदेव राठोड हे अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याची तक्रार सहायक निबंधक सहकारी संस्था मंगरूळपीर यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सहायक निबंधक पी.एन. गुल्हाने, सहकार अधिकारी ए.एम. राठोड यांच्या पथकाने सुखदेव राठोड रा. भडकुंभा यांच्याकडे आकस्मिक भेट देऊन तपासणी केली. यावेळी काही शेतकºयांच्या जमिनीची कागदपत्रे तसेच आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली आहेत. सहकार विभागाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती गुल्हाने यांनी दिली.