नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:37 AM2021-05-22T04:37:04+5:302021-05-22T04:37:04+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून संपूर्ण जिल्ह्यात ९ मे पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत सकाळी ७ ते ११ या ...

Action against shops violating the rules | नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई

googlenewsNext

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून संपूर्ण जिल्ह्यात ९ मे पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत सकाळी ७ ते ११ या चार तासांच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली; मात्र त्यानंतर दवाखाने, मेडिकल्स, बँका, कृषी सेवा केंद्र वगळता इतर कुठलीही दुकाने सुरू ठेवू नयेत, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. असे असताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने नगर परिषद पथकाने २१ मे रोजी सहा दुकानांवर धडक कारवाई केली. या माध्यमातून ५५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, नियम उल्लंघनप्रकरणी गेल्या २० दिवसांत नगर परिषदेच्या पथकाने २ लाख ८९ हजारांचा दंड वसूल केला आहे. मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख बाळकृष्ण देशमुख व विजय नाईक, पोलीस स्टेशनच्यावतीने संजय नाकट व जय हळकर हे पथकात सक्रिय सदस्य म्हणून काम पाहत आहेत.

Web Title: Action against shops violating the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.