वाशिम नगरपरिषदेच्यावतिने प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 03:38 PM2018-06-21T15:38:07+5:302018-06-21T15:38:07+5:30
प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखााली नगरपरिषदेच्यावतिने धडक कारवाई मोहीम हाती घेवून १० हजार रुपये दंड केल्याची कारवाई २० जून रोजी केली.
वाशिम : प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतांना सुध्दा तसेच अनेकदा नगरपरिषद प्रशासनाच्यावतिने धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. त्यानंतरही प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखााली नगरपरिषदेच्यावतिने धडक कारवाई मोहीम हाती घेवून १० हजार रुपये दंड केल्याची कारवाई २० जून रोजी केली.
शासनाच्यावतिने काही अपवाद वगळता सर्वच प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉलच्या वस्तुंवर बंदी आणल्याने याबाबत जनजागृती व यापूर्वी कारवाई केलेल्या दुकानांची झाडाझडती घेवून प्लास्टिक पिशव्या वापरणाºया दहा दुकानदारांवर कारवाई करुन यापुढे असा प्रकार आढळल्यास प्रथम ५ हजार, नंतर १० हजार व त्यानंतरही आढळून आल्यास २५ हजारापर्यंत दंड करुन पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. या मोहीमेची प्रतिष्ठानमालकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
वाशिम शहरातील बालाजी स्विट मार्ट, नवदुर्गा स्विट मार्ट, सतगुरु स्विट मार्ट, तिरुपती स्विटमार्ट अॅन्ड नमकीन, न्यू बँगलोर अय्यगर बेकरी या दुकानातील पिशव्या जप्त करुन त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड वसूल केले. सदर कारवाई स्वच्छता निरिक्षक जितु बढेल, राजेश महाले यांच्या पथकाने केली. ही मोहीम यापुढे अधिक तीव्र करुन वाशिम शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार वाशिम नगरपरिषदेने केला आहे.
शासनाच्यावतिने प्लास्टिक , थर्माकॉलपासून बनविलेल्या वस्तुंवर बंदी आणली असून दंडही मोठया प्रमाणात आकारण्यात येणार आहे. त्याकरिता दुकानदारांनी, नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यासह वस्तुंचा वापर टाळण्याबाबत नगरपरिषदेच्या पथकाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच २५ हजार रुपयांपर्यंत दंड असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोग्यासाठी अतिशय घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्या व साहित्याचा वापर करणाºयांवर नगरपरिषदेच्यावतिने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. तरी दुकानदारांनी याचा वापर टाळून होणारी कारवाई टाळावी. तसेच नगरपरिषद पथकासोबत कोणताही वाद घालू नये. प्लास्टिक निर्मूलन मोहीमेंतर्गंत यानंतर ही मोहीम अधिक तिव्र केल्या जाणार असल्याने सर्वांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
- गणेश शेटे, मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम