‘दांडीबाज’ कर्मचा-यांवर कारवाई!
By admin | Published: June 29, 2016 01:08 AM2016-06-29T01:08:11+5:302016-06-29T01:08:11+5:30
‘आमचं गाव-आमचा विकास’ उपक्रमातंर्गत कामचूकारपणा करणा-या कर्मचा-याविरोधात कारवाई करणार असल्याचे ‘सीईओं’चे सुतोवाच.
वाशिम : जिल्ह्यात सध्या ह्यआमचं गाव-आमचा विकासह्ण, या उपक्रमांतर्गत पंचायत गणस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्तरीय कर्मचार्यांनी त्यात सहभागी होणे क्रमप्राप्त आहे. यापुढे या कार्यशाळांना गैरहजर राहणार्या ह्यदांडीबाजह्ण कर्मचार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सुतोवाच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी मंगळवार, २८ जून रोजी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी मागील आठवड्यात मंगरूळपीर, मानोरा व मालेगाव तालुक्यातील काही प्रशिक्षण कार्यशाळांना भेटी दिल्या. यादरम्यान संबंधित अनेक ठिकाणी गावातील कर्मचारी अनुपस्थित असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. या गंभीर बाबीची पाटील यांनी दखल घेतली असून, ह्यदांडीबाजह्ण कर्मचार्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांना दिले आहेत. गावातील शिक्षक, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आरोग्यसेवक, रोजगार सेवक आदींनी प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे. दरम्यान, कार्यशाळांना गैरहजर राहणार्या कर्मचार्यांची माहिती मागविण्यात आली असून, संबधित विभागांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे.