तपासणी न केल्यास स्कूल बसेसवर कारवाई
By admin | Published: June 4, 2017 01:38 PM2017-06-04T13:38:35+5:302017-06-04T13:38:35+5:30
तपासणी न करणाºया स्कूल बसेसच्या चालक-मालकांविरूद्ध योग्य ती कारवाई केली जाईल.
वाशिम - विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्याच्या दृष्टिकोनातून शाळा सूरू होण्यापूर्वी प्रत्येक स्कूल बसेसची आवश्यक ती तांत्रिक तपासणी केली जात आहे. तपासणी न करणाऱ्या स्कूल बसेसच्या चालक-मालकांविरूद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला.
साधारणत: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरू होतात. विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात ९० च्या वर स्कूल बसेस आहेत. सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी या बसेसची तपासणी मोहिम उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अशी तपासणी होत आहे. तपासणीसाठी बसेस आणण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने केले. याऊपरही जे चालक किंवा मालक तपासणीसाठी बसेस आणणार नाही, अशा चालक-मालकांविरूद्ध परिवहन विभागाच्या नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाणार आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत ३५ च्या वर बसेसची तपासणी करण्यात आली आहे.