सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई; पाच जणांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 04:37 PM2019-02-03T16:37:12+5:302019-02-03T16:37:33+5:30
वाशिम : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखू बंदी कायद्यांतर्गत जिल्हा तंबाखू विरोधी अभियानच्या पथकाने बसस्थानकावर धुम्रपान करणाºयांवर रविवारी कारवाई करून दंड ठोठावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखू बंदी कायद्यांतर्गत जिल्हा तंबाखू विरोधी अभियानच्या पथकाने बसस्थानकावर धुम्रपान करणाºयांवर रविवारी कारवाई करून दंड ठोठावला आहे.
शासनाने सार्वजनिक स्थळी धुम्रपान करणे आणि तंबाखू सेवनावर बंदी टाकली असतानाही अनेक व्यक्ती या नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिकस्थळी धुम्रपान व तंबाखूचे सेवन करीत आहेत. यामुळे सभोवताली उपस्थित लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असतानाही त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. या पृष्ठभुमीवर कायद्याचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा तंबाखू विरोधी पथकाने मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत वाशिम येथील एसटी बसस्थानकावर वाशिम शहर पोलिस विभाग व तंबाखू विरोधी अभियान पथकाचे जिल्हा राष्टÑीय सल्लागार डॉ.आदिल पांडे यांनी पाहणी केली असता. ग्रामीण भागातील अनेक प्रवासी धुम्रपान करीत असल्याचे आढळून आले. या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या पथकाच्यावतीने ५ लोकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून प्रत्येकी ५० रुपये प्रमाणे २०० रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले. या पथकात राम सरकटे, रामकृष्ण धाडवे, पोलिस शिपाई विजय घुगे, व सुभाष राठोड यांनी सहकार्य केले.