मास्क न वापरल्याप्रकरणी २५८ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:40 PM2021-02-23T17:40:33+5:302021-02-23T17:41:28+5:30

Washim News गत तीन दिवसांत मास्क न वापरणाºया २५८ जणांवर नगर पंचायत व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे.

Action taken against 258 people for not using masks | मास्क न वापरल्याप्रकरणी २५८ जणांवर कारवाई

मास्क न वापरल्याप्रकरणी २५८ जणांवर कारवाई

Next

मालेगाव : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. गत तीन दिवसांत मास्क न वापरणाºया २५८ जणांवर नगर पंचायत व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने घराबाहेर पडताना सर्वांनी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मास्कचा वापर न करणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. गत तीन दिवसांत मालेगाव तालुक्यात मास्कचा वापपर न करणाºया २५८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वांचीच चिंताही वाढली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग व हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा प्रशासनाने दिला.

Web Title: Action taken against 258 people for not using masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम