विनापरवानगी मुख्यालय सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:30 PM2020-06-06T17:30:19+5:302020-06-06T17:30:38+5:30
सदर आदेश सर्व शासकीय कार्यालये व शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळे , आस्थापना यांना लागू राहतील असे आदेशात म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोव्हिड -१९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या लॉकडाऊन काळात राज्य शासकीय कर्मचाºयांची कार्यालयीन उपस्थिती मर्यादित ठेवण्याबाबत शासनाकडून सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. दरम्यान काही अधिकारी, कर्मचारी लॉकडाऊन कालावधीत पूर्व परवानगी शिवाय गैरहजर आहेत तसेच मुख्यालयी सोडून अन्य गावी गेल्याने इतर कर्मचाºयांवर ताण पडला असल्याने त्यांच्याविरुध्द महाराष्टÑ नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ अंतर्गंत शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच यापुढे जे कर्मचारी विनापरवानगी निर्देशित दिनी गैरहजर राहतील सदर कर्मचाºयाची तया आठवडयाची अनुपस्थिती देय व अनुज्ञेय अर्जित वा यथास्थिती विनावेतन रजा म्हणून नियमित करण्याचे आदेश सर्व प्रशासकीय विभागांना वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी ५ जून रोजी दिले आहेत.
अनेक शासकीय कार्यालयातील काही अधिकारी , कर्माचरी लॉकडाऊन कालावधी दरम्यान पूर्व परवानगीशिवाय गैरहजर राहल्याने कार्यालयात उपस्थित राहणाºया कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा अनाठायी ताण येत आहे. त्यासाठी प्रत्येक विभागातील विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्थ अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबत रोस्टर तयार करावे ज्यामध्ये प्रत्येक कर्मचारी आठवडयात किमान एक दिवस हजर राहतील. पूर्व मंजुर अर्जित व तत्सम तसेच वैद्यकीय कारणास्तव रेजवर असलेल्या कर्मचाºयांव्यतिरिक्त सर्व कर्मचाºयांपेैकी प्रत्येक कर्मचाºयाला आठवडयातून किमान एक दिवस कार्यालयात हजर राहणे अनिवार्य राहिल असे आदेश काढण्याचे सूचित केले असून सदर आदेश ८ जूनपासून अंमलात येणार आहेत. सदर आदेश सर्व शासकीय कार्यालये व शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळे , आस्थापना यांना लागू राहतील असे आदेशात म्हटले आहे.