‘व्हाॅटसअप’वरील छायाचित्रावरून होणार नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:19+5:302021-04-17T04:40:19+5:30

संचारबंदी काळात वैध कारणासाठी प्रवासी वाहतूक सुरू राहणार असून ऑटोरिक्षामध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये (चारचाकी) चालक व उपप्रादेशिक ...

Action will be taken against the vehicles violating the rules based on the photo on WhatsApp | ‘व्हाॅटसअप’वरील छायाचित्रावरून होणार नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई

‘व्हाॅटसअप’वरील छायाचित्रावरून होणार नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई

Next

संचारबंदी काळात वैध कारणासाठी प्रवासी वाहतूक सुरू राहणार असून ऑटोरिक्षामध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये (चारचाकी) चालक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी, बसमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी मान्यता दिलेल्या क्षमतेएवढे प्रवासी घेण्यास मुभा आहे, मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई आहे. प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशाने योग्यरीत्या मास्क परिधान केलेला असावा. चारचाकी टॅक्सीमध्ये एखाद्या व्यक्तीने व्यवस्थितरीत्या मास्क परिधान केला नसेल अशावेळी प्रवाशांसह चालकाविरुद्ध दंड आकारण्यात व नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वाहनधारक व प्रवाशांनी या नियमांचे पालन करावे. या नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी ९८५०८७३२८७ किंवा ९९२३३१७९०९ या व्हाॅट्सअप क्रमांकावर सदर वाहनाचा क्रमांक दिसेल असे छायाचित्र काढून पाठवावे. या छायाचित्राच्या आधारे सदर वाहनावर कारवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हिरडे यांनी सांगितले. तसेच परवानगी नसलेल्या खाजगी प्रवासी बसेस, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सी, परवाना नसलेल्या ऑटोरिक्षा, परवाना नसलेली खासगी प्रवासी वाहने, अवैध प्रवासी वाहनांमध्ये नागरिकांनी प्रवास करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Action will be taken against the vehicles violating the rules based on the photo on WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.