अडाण प्रकल्पातील जलसाठा भागवतोय २५ गावांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 03:14 PM2019-05-26T15:14:42+5:302019-05-26T15:15:18+5:30

इंझोरी (वाशिम): जिल्हाभरात पाणीटंचाईमुळे हाहाकार उडाला असला तरी, कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्प मात्र सध्याही कारंजाशहरासह २५ गावांची तहान भागवित आहे.

Adam dam water for 25 Villages | अडाण प्रकल्पातील जलसाठा भागवतोय २५ गावांची तहान

अडाण प्रकल्पातील जलसाठा भागवतोय २५ गावांची तहान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
इंझोरी (वाशिम): जिल्हाभरात पाणीटंचाईमुळे हाहाकार उडाला असला तरी, कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्प मात्र सध्याही कारंजाशहरासह २५ गावांची तहान भागवित आहे. तथापि, आता या प्रकल्पातील पातळीत झपाट्याने घट होत असल्याने पुढील वर्षी अपुरा पाऊस पडल्यास या प्रकल्पावर अवलंबून गावांतही पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची भिती आहे.
जिल्ह्यातून वाहणाºया आणि मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदीवर वाशिम जिल्ह्याच्या अगदी टोकावर कारंजा तालुक्यात मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरात जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मध्यम प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा उद्देश सिंचन व पाणीपुरवठा हा आहे. या प्रकल्पाची उंची पायथ्यापासून सुमारे ३०.१३ मी (९८.९ फूट) आणि लांबी ७५५ मी (२,४७७ फूट) इतकी आहे. या प्रकल्पाची साठवणक्षमता ५.०४़१०१३ घन फूट असून पूर्ण भरण क्षमता २.७६५८४५़१०१५ घन फूट इतकी आहे. हा प्रकल्प गोदावरीच्या खोºयात येतो. या प्रकल्पावर शेकडो हेक्टर क्षेत्रात सिंचनही केले जाते. यात वाशिम जिल्ह्यासह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांनाही फायदा होतो. निर्मितीपासून आजवरही या प्रकल्पाच्या भरवशावर असलेल्या शहरांत पाणीटंचाईची समस्या फारशी जाणवली नाही. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने या प्रकल्पातून कारंजा शहराची तहान भागविली जाते, तसेच २४ गावे पाणी पुरवठा योजनेंतर्गत कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार परिसरातील ८ गावे आणि मानोरा तालुक्यातील १६ गावांची तहान भागविली जाते. रखरखत्या उन्हामुळे जिल्ह्यातील ८० प्रकल्प कोरडे पडले असताना आणि उर्वरित प्रकल्पांनी तळ गाठला असताना अडाण प्रकल्पात २० टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे. त्यामुळेच या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या कारंजा शहरासह २४ गावांत मुबलक पाणी पुरवठा होत आहे.
 
गाळ उपसा करण्याची गरज
गेल्या अनेक वर्षांपासून अडाण प्रकल्पाची पातळी कधीही १५ टक्क्यांच्या खाली गेली नाही. दरवर्षीच्या पावसाळ्यात नदीत वाहून येणारा गाळ या प्रकल्पात साचल्याने प्रकल्पाची साठवण क्षमता कमी झाली आहे. काही शेतकरी स्वयंस्फूर्तीने या प्रकल्पाच्या कोरड्या भागातून गाळाचा उपसा करीत असले तरी, त्याचा म्हणावा तेवढा फायदा खोलीकरणास होत नाही. त्यामुळे शासनाने गाळयुक्त शिवार, गाळमूक्त धरण अभियानांतर्गत या प्रकल्पातील गाळाचा त्वरीत उपसा करून शेतकºयांना गाळ नेण्यास प्रोत्साहीत करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Adam dam water for 25 Villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.