व्यसनमुक्त समाज हाच सशक्त देशाचा आधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 05:30 PM2019-05-31T17:30:02+5:302019-05-31T17:30:26+5:30
व्यसनमुक्त समाज हाच खरा सशक्त व प्रगत देशाचा आधार असल्याचे प्रतिपादन ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी ३१ मे रोजी केले. प्र
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : व्यसनाचे सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक जीवनावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात. प्रत्येकाने व्यसन टाळावे. व्यसनमुक्त समाज हाच खरा सशक्त व प्रगत देशाचा आधार असल्याचे प्रतिपादन ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी ३१ मे रोजी केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रिसोडच्यावतीने जागतिक तंबाखू दिनानिमित्त स्थानिक भारत विद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
विद्यार्थ्यांना व्यसनाचे सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक जीवनातील दुष्परिणामाची जाणीव यावेळी ज्योती दिदी यांनी करून दिली. व्यसनाचे सामाजिक स्वास्थ, आर्थिक नियमितता, शारीरिक सुदृढता, आध्यात्मिक मानसिकतेवर विपरीत परिणाम होतात. भारत देशात दरवर्षी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून लाखो युवक, नागरिकांचा मृत्यू होतो. त्यांच्यावरील आवश्यक वैद्यकीय खर्चामुळे देशाची आर्थिक स्थिती मोडकळीस येते; तो देश अपेक्षित प्रा. विकासापासून वंचित राहतो, असा दावाही ज्योती दिदि यांनी केला. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वत: मानसिकदृष्टया व्यसनापासून अलिप्त राहत नाही; तोपर्यंत व्यसनमुक्त समाजाची कल्पना करणे चुकीचे आहे, असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी प्रा. अमोल सुतार, प्रा. बाळासाहेब देशमुख, राजकुमार गाडे, प्रा. रवी अंभोरे, विष्णू खनपटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीदेखील विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व अभार प्रदर्शन प्रा. रवी अंभोरे यांनी केले.