पावसाअभावी खरिपासोबतच रब्बीवरही घोंगावतेय संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 07:38 PM2017-09-07T19:38:30+5:302017-09-07T19:38:43+5:30

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात कागदावर ६० टक्क्याच्या आसपास पाऊस कोसळल्याचे दिसत असले तरी हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा आणि जमिनीत मुरणारा नसल्यामुळे सिंचन प्रकल्पांसह इतर सर्वच जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढलेली नाही. याशिवाय पावसाअभावी खरिप हंगामातील पिकांना जबर फटका बसला असून आगामी रब्बी हंगामावरही संकट घोंगावत असल्याचे दिसून येत आहे. 

In addition to the expense of rain, rabbi is also dangerous! | पावसाअभावी खरिपासोबतच रब्बीवरही घोंगावतेय संकट!

पावसाअभावी खरिपासोबतच रब्बीवरही घोंगावतेय संकट!

Next
ठळक मुद्देसिंचन प्रकल्पांसह इतर सर्वच जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढलेली नाहीपावसाअभावी खरिप हंगामातील पिकांना जबर फटका 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात कागदावर ६० टक्क्याच्या आसपास पाऊस कोसळल्याचे दिसत असले तरी हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा आणि जमिनीत मुरणारा नसल्यामुळे सिंचन प्रकल्पांसह इतर सर्वच जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढलेली नाही. याशिवाय पावसाअभावी खरिप हंगामातील पिकांना जबर फटका बसला असून आगामी रब्बी हंगामावरही संकट घोंगावत असल्याचे दिसून येत आहे. 
जिल्ह्यात यंदा ४.५ लाख हेक्टरच्या जवळपास खरिप हंगामातील सोयााबिन, उडिद, मूग यासह इतर पिकांची पेरणी झालेली आहे. मृगनक्षत्रादरम्यान चांगला पाऊस झाल्याने यंदा चांगले उत्पादन होईल, अशी आशा बाळगून असलेल्या शेतकºयांना पावसाने मात्र त्यानंतरच्या काळात मोठा दगा दिला. पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होण्यासोबतच नापिकीचे संकट शेतकºयांसमक्ष उभे ठाकले आहे. यासह सिंचन प्रकल्पांची पाणीपातळी प्रचंड प्रमाणात खालावल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार असून रब्बी हंगामही धोक्यात सापडला आहे. 

Web Title: In addition to the expense of rain, rabbi is also dangerous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.