वाशिम जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांना मिळणार वेतन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 03:25 PM2019-01-09T15:25:17+5:302019-01-09T15:25:36+5:30
वाशिम : जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांची वेतन देयके सादर करण्याचे लेखी निर्देश वाशिमचे माध्यमिक शिक्षणाधिकारी .टी.ए. नरळे यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत.
वाशिम : जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांची वेतन देयके सादर करण्याचे लेखी निर्देश वाशिमचे माध्यमिक शिक्षणाधिकारी .टी.ए. नरळे यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनासाठी शिक्षक महासंघाने दिलेल्या लढ्यास यश मिळाल्याची माहिती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी दिली.
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची वेतन देयके वाशिमचे वेतन पथक अधिक्षक कार्यालय स्विकारत नसल्यामुळे त्यांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. यासंबंधी शिक्षक महासंघास वाशिम व अकोला जिल्ह्यातील शिक्षक बांधवांची असंख्य निवेदने व तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत शेखर भोयर यांनी शिक्षणाधिकारी नरळे यांच्याशी संवाद साधला असता २ दिवसात वेतन अदा करण्याचे पत्र निर्गमीत करण्याचे अभिवचन त्यांनी दिले होते. दिलेला शब्द पाळत शिक्षणाधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना अतिरिक्त शिक्षकांची वेतन देयके सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती भोयर यांनी दिली. शिक्षणाधिकाºयांनी घेतलेल्या सकारात्मक भुमिकेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शेकडो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.