पुरेशा प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:42 AM2021-04-27T04:42:28+5:302021-04-27T04:42:28+5:30

००० रिठद येथे आणखी दोन कोरोना रुग्ण वाशिम : वाशिम तालुक्यातील रिठद येथे सोमवारी आणखी दोनजणांचा कोरोना चाचणी ...

Adequate stock of vaccines should be available | पुरेशा प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध व्हावा

पुरेशा प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध व्हावा

Next

०००

रिठद येथे आणखी दोन कोरोना रुग्ण

वाशिम : वाशिम तालुक्यातील रिठद येथे सोमवारी आणखी दोनजणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून नागरिकांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

००००

झोडगा-उंबर्डा रस्त्याची पाहणी

वाशिम : मंजुरी मिळूनही झोडगा-उंबर्डा बाजार या रस्त्याचे काम पूर्णपणे व दर्जेदार करण्यात आले नाही. रस्त्याच्या कडा भरल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावर चालकांची कसरत सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

000

आरोग्य केंद्रातील सात पदे रिक्त

वाशिम : मेडशी, शिरपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत रिक्त पदांची समस्या वाढतच आहे. सद्य:स्थितीत आरोग्यवर्धिनी केंद्रात विविध संवगार्तील सात पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण अधिकच वाढत आहे.

00

पीककर्जासाठी शेतकऱ्यांची गर्दी

वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असल्याने पीककर्ज मिळविण्यासाठी बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याचे सोमवारी दिसून आले. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे, असे आवाहन प्रशासनाने केले.

०००००

आधार लिंकअभावी अडचणी

वाशिम : अनुसूचित जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेच्या रकमा आधार क्रमांक लिंक न केल्याने पूल खात्यामध्ये बँक खात्याशी प्रलंबित आहेत.

00

केनवड येथे आरोग्य तपासणी

वाशिम : वाशिम तालुक्यातील केनवड येथे सोमवारी आणखी दोन कोरोना रुग्ण आढळून आले असून, संदिग्ध रुग्णांची तपासणी सोमवारी करण्यात आली. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

०००

सकाळच्या सुमारास बाजारात गर्दी

वाशिम : सकाळच्या सुमारास मालेगाव व रिसोड येथील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत असल्याचे सोमवारी दिसून आले. कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी गर्दी टाळणे आवश्यक ठरत आहे.

००००

व्यावसायिकांची कोरोना चाचणी

वाशिम : २० दिवसांपूर्वी ज्यांनी कोरोना चाचणी केली व अहवाल निगेटिव्ह आला, अशा व्यावसायिकांना आता पुन्हा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. संचारबंदीच्या काळात दर १५ दिवसांनंतर कोरोना चाचणी करून निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवावा लागणार आहे.

०००

रस्त्यावर खड्डे; वाहनचालकांची गैरसोय

वाशिम : स्थानिक पाटणी चौक ते अकोला नाका या दरम्यान जुनी जिल्हा परिषदेसमोरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यासाठी निधी मिळाला असून, कामाला प्रत्यक्षात सुरुवात केव्हा होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे.

००००

२०० नागरिकांची आरोग्य तपासणी

वाशिम : रिसोड तालुक्यातील हराळ येथे तीन, करडा येथे दोन कोरोना रुग्ण सोमवारी आढळून आले असून, जवळपास २०० नागरिकांची तपासणी करण्यात आली. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

०००

Web Title: Adequate stock of vaccines should be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.