वाशिम जिल्ह्यात बँकांमधील आधार नोंदणीचा बोजवारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 05:15 PM2018-10-28T17:15:12+5:302018-10-28T17:15:52+5:30

बहुतांश बँकांमध्ये ही सोय देण्यास टाळाटाळ होत असून आधार नोंदणी प्रक्रियेचा बोजवारा उडाला आहे.

Adhar cards registration in banks in Washim district! | वाशिम जिल्ह्यात बँकांमधील आधार नोंदणीचा बोजवारा!

वाशिम जिल्ह्यात बँकांमधील आधार नोंदणीचा बोजवारा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : महा-ई-सेवा केंद्रांकडून चालविल्या जाणारे आधार नोंदणी केंद्र १७ जुलैपासून बंद झाले. त्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून राष्ट्रीयीकृत बँका आणि पोस्टामध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, बहुतांश बँकांमध्ये ही सोय देण्यास टाळाटाळ होत असून आधार नोंदणी प्रक्रियेचा बोजवारा उडाला आहे. आधार ‘अपडेट’चा प्रश्नही गंभीर झाला असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.
राज्य, केंद्र शासनाची ‘यूआयडी अ‍ॅथोरिटी’ आणि महा आॅनलाईन कंपनीच्या जाचक अटींमुळे जिल्हाभरातील आधार नोंदणी करणाºया जिल्ह्यातील ५४ महा ई-सेवा केंद्र संचालकांनी त्यांच्याकडे असलेले आधार नोंदणी यंत्र जिल्हा प्रशासनाकडे सोपवून १७ जुलैपासून आधार नोंदणी बंद केली. संबंधितांच्या मागण्या शासनस्तरावर अद्याप प्रलंबित असून त्यावर कुठलाही ठोस तोडगा अद्याप निघालेला नाही. यादरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी राष्ट्रीयीकृत बँका आणि पोस्टामध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले. त्यानुसार कारंजा २७, मंगरूळपीर १३, वाशिम ५१, मालेगाव १६, मानोरा ५ आणि रिसोड तालुक्यात १८, असे एकूण १३० केंद्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक बँकांनी ही सोय देण्यास टाळाटाळ चालविल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. 
 

वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. मात्र, सर्वेक्षणादरम्यान केवळ वाशिममध्येच ६ ते ७ ठिकाणी केंद्र सुरू असल्याचे निदर्शनास आले असून अन्य ठिकाणची चौकशी केली जात आहे.
- डी.व्ही. निनावकर
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिम

Web Title: Adhar cards registration in banks in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.