बॅंकेतील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:40 AM2021-05-26T04:40:39+5:302021-05-26T04:40:39+5:30
काेराेना संसर्ग पाहता, नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्कचा वापर व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे, तसेच बॅंकेत गर्दी ...
काेराेना संसर्ग पाहता, नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्कचा वापर व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे, तसेच बॅंकेत गर्दी टाळण्यासाठी बॅंक प्रशासनानेही खातेदारांना वेगवेगळ्या दिवसांचे वाटप केले आहे. असे असतानाही बँकेतील गर्दी कमी हाेताना दिसून येत नाही. बहुतांश बॅंकेमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन हाेत नसून, अनेक जण विनामास्कच प्रवेश करीत आहेत. यावेळी बॅंक प्रशासनाने संबंधितास नियमांचे पालन करण्याचे सांगण्याऐवजी अनेक ठिकाणी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. बॅंकेत येणारे ग्राहक काेराेनाचे वाहक ठरू नयेत, याकरिता जिल्हा प्रशासनाने कठाेर पावले उचलणे गरजेचे आहे.
.......................
जिल्हा प्रशासनानेही सूचना देऊन झाले माेकळे
बॅंकेत गर्दी हाेणार नाही, याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने हात झटकल्याचे दिसून येत आहे. ज्या बॅंकेसमाेर गर्दी हाेत आहे, त्या बॅंक प्रशासनाला काेणताच जाब न विचारला जात असल्याने, बॅंक प्रशासनही बिनधास्तपणे वागताना दिसून येत आहे. आतापर्यंत एकाही बॅंकेला गर्दी झाल्यामुळे साधी नाेटीस प्रशासनाने बजावली नसल्याची माहिती आहे.
.................
बॅंकेत गर्दी हाेऊ नये, याकरिता वेळाेवेळी बॅंक प्रशासनासाेबत चर्चा करण्यात आली आहे, तसेच मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. बॅंकेत येणाऱ्या ग्राहकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्याचे सूचित करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील.
.... शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.