वाशिम जिल्ह्यातील सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 05:39 PM2019-06-18T17:39:22+5:302019-06-18T17:39:55+5:30
जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांच्या आदेशावरून सोमवार, १८ जून रोजी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. तसेच जिल्ह्याबाहेरून वाशिम पोलिस दलात नव्याने रुजू होणाºया अधिकाºयांची नावेही जाहीर करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील ११ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात गजाननसिंह बायस, ज्योती विल्हेकर, हरीभाऊ कुळवंत, उदय सोयस्कर, शे. रहीम शे. गफ्फार, कमलेश खंडारे, समाधान वाठोरे, विनायक जाधव, राहुल जगदाळे, विजय रत्नपारखी आणि राहुल वाढवे यांचा समावेश आहे; तर बुलडाणा येथील गौरीशंकर पावळे आणि यवतमाळातील शिवाजी लष्करे या दोन अधिकाºयांना वाशिम जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आलेली आहे.
यासह जिल्ह्यातील १३ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून त्यात नामदेव तायडे, सुरेश तोटावार, विलास इंगळे, विठ्ठल खुळे, तुकाराम ढोके, योगेश धोत्रे, राहुल गुहे, नारायण पांचाळ, अमीत जाधव, अशोक जायभाये, धर्माजी डाखोरे, गिरीश तोगरवाड, श्रीकांत विखे, राहुल कातकाडे यांचा समावेश आहे. तुळशीराम पाटील आणि असदउल्लाखान हफीजउल्लाखान पठाण या दोघांना सेवानिवृत्तीपर्यंत; तर भगवान पायघन आणि रामबाबु सरोदे या दोन पोलिस उपनिरीक्षकांना वर्षभराची मुदतवाढ मिळाली आहे. परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात रुजू होणाºया पोलिस उपनिरीक्षकांमध्ये सविता वड्डे, संगीता रंधे, संतोष आघाव, दिलीप गवई, रामभाऊ भाष्कर, तानाजी गव्हाणे, मच्छिंद्रनाथ भालेराव, संतोष नेमणार, देविदास वाघमोडे, संतोष जंजाळ, प्रमोद सोनवणे, विलास मुंढे आणि मौनालिया मोरे यांचा समावेश आहे. तसेच विश्वास वानखेडे यांना विनंतीवरून अमरावती ग्रामीण पोलिस स्टेशनला पदस्थापना देण्यात आली आहे.