वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रा.पं.तींमध्ये प्रशासकराज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:15 PM2020-08-24T17:15:47+5:302020-08-24T17:17:25+5:30
१६३ ग्रामंपचायतींमधील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी ३१ आॅगस्टपर्यंत संपुष्टात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आॅगस्टमध्ये पाच वर्षांची मुदत संपणाºया जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दीपक कुमार मीना यांनी जिल्ह्यातील सहाही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाºयांना २४ आॅगस्ट रोजी दिला.
जिल्ह्यात एकूण ४९१ ग्रामपंचायती असून, यापैकी १६३ ग्रामंपचायतींमधील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी ३१ आॅगस्टपर्यंत संपुष्टात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मुदत संपणाºया ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नेमण्याच्या शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी २४ आॅगस्ट रोजी सहाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना दिला. या आदेशानुसार एका प्रशासकाकडे केवळ एकाच ग्रामपंचायतीचा कार्यभार सोपविण्यात येणार आहे. गट अ, गट ब व गट क या प्रत्येक संवर्गातील अधिकारी, कर्मचाºयांकडे प्रशासकाची धूरा सोपविण्यात येणार आहे. यामध्ये गटशिक्षणाधिकारी, पशुधन विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांचा समावेश आहे.
प्रशासकांना मिळणार प्रशिक्षण !
गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, कृषी अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांना ग्राम पंचायतचा फारसा अनुभव नसतो. आर्थिक व्यवहार, विविध योजना, डिजिटल स्वाक्षरी यासह ग्रामपंचायतींच्या एकूण कामकाजाची माहिती देण्याबरोबरच या प्रशासकांना तज्ज्ञांकडून पंचायत समिती स्तरावर प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.