वाशिम बाजार समितीवर प्रशासक
By admin | Published: September 13, 2014 11:13 PM2014-09-13T23:13:22+5:302014-09-13T23:13:22+5:30
वाशिम जिल्हा बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला.
वाशिम : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर १२ सप्टेंबरच्या आदेशान्वये जिल्हा उपनिबंधकांनी नियमांच्या अधिन राहून प्रशासकाची नेमणूक केली आहे. जिल्हा उ पनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांची वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदी नियुक्ती झाली आहे.
यासंदर्भात अधिक माहितीनुसार वाशिम बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ १६ जुलै २0१३ रोजी संपला होता. ८ फेब्रुवारी २0१३ च्या शासकीय अधिसुचनेनुसार सहा महिने बाजार समितीच्या निवडणूका पुढे ढकलण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यानंतर शासनाने पुन्हा संचालक मंडळाच्या निवडणूकिस ७ मार्च २0१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. शासन आदेशान्वये देण्यात आलेली मुदतवाढही संपली होती. पत्रानुसार उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात शासनाचे मुदतवाढीबाबत रिट याचीका दाखल झालेली आहे.सोबतच शासन आदेशास अंतरिम स्थगिती दि. २३ जुलै २0१४ च्या आदेशानुसार दिली असुन प्रकरण अंतिम सुनावणीकरिता प्रलंबीत आहे. त्या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम ५९ नुसार संचालक मंडळास मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. परंतू त्या प्रस्तावाच्या संबंधाने आजपर्यंत शासनाकडून कोण त्याही प्रकारचे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १५ अ (१), (ब) नुसार प्रशासकाची नियुक्ती करणे अनिवार्य झाले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी १२ सप्टेंबर २0१४ रोजी आदेश निर्गमित करुन वाशिम कृषी उत् पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदाची सुत्रे स्वत:कडे घेतली आहेत.
या आदेशात ८ सप्टेंबरपासून बाजार समितीच्या सर्व समिती सदस्यत्वाचे सदस्यत्व पद धारण करण्याचे बंद होईल असेही खाडे यांनी स्पष्ट केले आहे. कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १५ अ (४) प्रमाणे प्रशासकास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पुर्वमान्यतेने परिश्रमीक घेण्याचा अधिकार असल्याचेही जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.