गोवर्धना गावात आरोग्य चमू दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:46+5:302021-04-18T04:40:46+5:30
०००००००००० सिमेंट, रेती, लोखंड महागले वाशिम : लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यावसायिकांनी बांधकामाचे साहित्य चढ्या भावाने विक्री करणे सुरू केले ...
००००००००००
सिमेंट, रेती,
लोखंड महागले
वाशिम : लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यावसायिकांनी बांधकामाचे साहित्य चढ्या भावाने विक्री करणे सुरू केले आहे. त्याचा फटका सर्वसाधारण घरकुलधारकांना बसू लागला आहे. सिमेंट, रेती व लोखंडाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी घरबांधणी दिवास्वप्न ठरणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
००००००००
यंदाही उन्हाळी शिबिरे लॉकडाऊन
वाशिम : लॉकडाऊनमध्ये कोचिंग क्लासवर बंदी घालण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाने डोके वर काढल्याने यंदाही कार्यशाळा आणि शिबिर ऑनलाईन होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे बच्चेकंपनी पुन्हा घरबंद झाल्याचे दिसून येते.
०००००
ग्रामपंचायत सदस्य मानधनाविना
वाशिम : नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रातील सदस्यांना वाढीव मानधन देण्यात येते. त्यांना रहिवासी, परिचय दाखला देण्याची मुभा आहे; परंतु, ग्रामपंचायत सदस्यांना अशा प्रकारचे कोणतेच अधिकार नाही. आता ग्रामपंचायत सदस्यांनाही असे अधिकार देण्यात यावे, अशी मागणी सरपंच संघटनेेने केली.
००
शेलुबाजारात आरोग्य तपासणी
वाशिम : शेलुबाजार गावात आणखी दोन कोरोनाबाधित असल्याचे शनिवारी निष्पन्न झाले. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने तपासणी व सर्वेक्षण केले असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले.