दिव्यांग विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य देऊन शाळा प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:06+5:302021-06-30T04:26:06+5:30
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी केंद्रशाळा, काजळेश्वर येथे विशेष गरजा असणारे दिव्यांग विद्यार्थी स्वरा विनोद चव्हाण, ओम ...
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी केंद्रशाळा, काजळेश्वर
येथे विशेष गरजा असणारे दिव्यांग
विद्यार्थी स्वरा विनोद चव्हाण, ओम विक्रम गायकवाड या विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेच्या
पहिल्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन
कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी
यांनी २८ जून रोजी केले. त्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले. पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी गटसाधन केंद्राचे विशेष शिक्षक सचिन घुले, केंद्रप्रमुख निर्मला गोंदेवार, समावेशित साधन व्यक्ती अतुल गणवीर तथा शालेय कर्मचारी यांची उपस्थिती होती. नवीन प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांचा शिक्षण विभाग, पंचायत समिती, कारंजा यांनी त्यांच्या घरी जाऊन सन्मान केल्याबाबत जिल्हा परिषद सदस्य अशोकराव डाेंगरदिवे, पंचायत समिती सदस्य रंगराव धुर्वे, प्रहार जनशक्तीचे सेवक प्रदीप उपाध्ये यांनी समाधान व्यक्त केले.