कोरोनाची लक्षणे दिसताच चाचणी करण्याचा सल्ला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:39+5:302021-05-14T04:40:39+5:30
कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्याच्या उद्देशाने आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी येथे तहसीलदारांनी सर्व खासगी डॉक्टरांची तातडीची बैठक घेतली. यावेळी ...
कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्याच्या उद्देशाने आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी येथे तहसीलदारांनी सर्व खासगी डॉक्टरांची तातडीची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. जे.सी. हायस्कूलमध्ये झालेल्या बैठकीस वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊसाहेब लहाने, डॉ. किरण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी तहसीलदार मांजरे म्हणाले की, कारंजा शहरात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. विशेषत: गंभीर अवस्थेत पोहचलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साैम्य लक्षणे ओळखून पहिल्याच टप्प्यात रुग्णांवर उपचार होणे आवश्यक ठरत आहे. त्यानुषंगाने खासगी दवाखान्यांमध्ये येणाऱ्या संदिग्ध रुग्णांची तातडीने कोरोना चाचणी करून त्यादृष्टीने उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. खासगी डाॅक्टरांनी त्यासाठी सजग राहावे, असे आवाहन यावेळी तहसीलदार मांजरे यांनी केले.