गुटखाबंदीनंतर तंबाखुकडे कल

By admin | Published: December 12, 2014 12:32 AM2014-12-12T00:32:40+5:302014-12-12T00:32:40+5:30

गुटखाबंदीचा सर्वत्र फज्जा उडालेला दिसून येत आहे.

After gossiping | गुटखाबंदीनंतर तंबाखुकडे कल

गुटखाबंदीनंतर तंबाखुकडे कल

Next

वाशिम : शासनाने गुटखा बंदी केली. व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम पाहता शासनाचा निर्णय उत्तम असला तरी योग्य अंमलबजावणी अभावी गुटखाबंदीचा सर्वत्र फज्जा उडालेला दिसून येत आहे. गुटखा बंदी नावा पुरतीच असून, सर्रास गुटखा पुड्या विक्रीस मिळत असून, चढत्या भावाने मिळत आहे. फार बोटावर मोजण्याइतपत गुटखा शोैकीन गुटखा बंदीनं तर गुटखा सुरुवातीला मिळाला नाही म्हणून तंबाखुकडे वळल्याचे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून आढळून आले. गुटखा बंदीमुळे शासनाचा महसूल तर बुडालाच; पण गुटखा बंद झाला नसल्याचे दिसून येत आहे. आज लोकमतने केलेल्या सर्वेक्षणामध्ये गुटखाबंदीमुळे व्यसन कमी होण्यापेक्षा वाढले, असे मत ७0 टक्के नागरिकांनी व्यक्त केले, तर गुटखाबंदीनंतर ५0 टक्के लोक तंबाखुकडे वळले असल्याचे आढळून आले. लोकमतने केलेल्या सर्वेक्षणामध्ये गुटखाबंदीनंतर गुटखा बंद झाला काय, यावर ७0 टक्के नागरिकांनी नाही म्हणून तर १0 टक्के लोकांनी काही प्रमाणात बंद झाला, असे म्हटले आहे. गुटखाबंदीच्या अंमलबजावणीबाबत ९0 टक्के नागरिकांनी तर १0 टक्के नागरिकांनी असमाधान व्यक्त केले. गुटखाबंदीनंतर व्यसनावर काही प्रमाण झाले काय तर ४0 टक्के नागरिकांनी होकार दिला तर ६0 टक्के लोकांनी नकार दिला. गुटखाबंदीनंतर गुटखा माफीयांचाच फायदा झाला असून, त्या पाठोपाठ ३५ टक्के किरकोळ विक्रेत्यांचा झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. गुटखा सेवनाने काय काय परिणाम होतात, याची कल्पना ७0 टक्के नागरिकांना माहीत आहे. गुटखाबंदी नियम कडक करणे आवश्यक आहे का, यावर मात्र ९५ टक्के नागरिकांनी आवश्यक असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले.

Web Title: After gossiping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.