कीटकनाशक फवारणीनंतर ३ एकरातील पीक करपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:34+5:302021-07-07T04:51:34+5:30
कृषी सहायक विलास ढवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांनी पिकावर तणनाशकाची फवारणी केल्याने शेतातील पिके करपून ...
कृषी सहायक विलास ढवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांनी पिकावर तणनाशकाची फवारणी केल्याने शेतातील पिके करपून गेल्याच्या अनेक घटना घडल्या मात्र, कीटकनाशकाची फवारणी केल्याने मेडशी येथील शेख सुलतान शेख सरोवर यांच्या शेतातील पीक करपल्याची पहिलीच घटना घडली आहे. आधीच पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडला असताना अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. शेतात जमिनीत पुरेसा ओलावा असेल तरच तणनाशक असो किंवा कीटकनाशकाची फवारणी करावी अन्यथा फवारणी करण्याचे टाळावे, असे कृषी सहायक विलास ढवळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी कृषी सहायक ढवळे यांच्यासोबत शेख मजहर, सोयल पठाण, अजिंक्य मेडशीकर उपस्थित हाेते.
...............
फवारणी करताना ही घ्या काळजी
फवारणी करण्यापूर्वी ज्या ट्रॅक्टर पंपाद्वारे ती करणार आहे, तो पंप अगोदर कोणाच्या शेतातून काय फवारणी करून आला याची अचूक माहिती घ्यावी व त्या नंतर तो पंप गरम पाणी, लिक्विड, निरमा पावडर यांनी टाकी साफ करून नळी मधील पाणी सुद्धा पूर्ण बाहेर निघेल याची खबरदारी घ्यावी.