तीन महिन्यानंतर पुन्हा समाधान शिबिर !
By admin | Published: June 27, 2017 01:51 PM2017-06-27T13:51:25+5:302017-06-27T13:51:25+5:30
तीन महिन्यानंतर पुन्हा समाधान शिबिर घेणार असल्याचे वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जाहिर केले.
वाशिम - नागरिकांच्या तक्रारींचे आॅन दी स्पॉट निराकरण करण्यासाठी तीन महिन्यानंतर पुन्हा समाधान शिबिर घेणार असल्याचे वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जाहिर केले. त्यानुसार जिल्हा प्रशासनातर्फे यापुढे तीन महिन्याच्या कालावधीत समाधान शिबिराचे आयोजन तीन उपविभागीय महसूल स्तरावर केले जाणार आहे.
महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्ह्यात तीनही उपविभागस्तरावर शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस समाधान शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये जवळपास ९०० तक्रारींचे निवारण करण्यात आले. या शिबिरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत होते. त्यामुळे यापुढे प्रत्येक तीन महिन्याला समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री राठोड यांनी रविवारी जाहिर करून टाकले होते. सर्व शासकीय विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना एकत्र आणून नागरिकांच्या जास्तीत जास्त तक्रारींचा जलद गतीने निपटारा करण्यास यापुढेही प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार यापुढे तीन महिन्याने समाधान शिबिर घेतले जाणार आहे. सदर शिबिर घेण्यापूर्वी नागरिकांना तक्रारी, समस्या सादर करण्याचे आवाहन केले जाणार आहे.