दोन वर्षांनंतर मिळाली तुरीची नुकसानभरपाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:25 AM2017-08-14T02:25:37+5:302017-08-14T02:26:04+5:30
वाशिम: तूर उत्पादक शेतकर्यांना (बिगर कर्जदार) सन २0१४-१५ व सन २0१५-१६ या दोन वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले. तथापि, या शेतकर्यांच्या पिकांचा विमा उतरविलेला असल्याने शासनाकडून ५0 टक्के नुकसानभरपाई (हेक्टरी ४७८८ रुपये) मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार गत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली जवळपास ३.२५ कोटी रुपये रक्कम मंजूर होऊन संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली जात असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क

२0१४-१५ आणि २0१५-१६ या दोन वर्षांंत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिल्यामुळे तूर पिकाला जबर फटका बसला होता. त्यानुसार, नुकसान झालेल्या क्षेत्राचा अहवाल प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळण्यास शेतकर्यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. सध्या ही रक्कम शासनाकडून मंजूर होऊन संबंधित पात्र शेतकर्यांच्या खात्यात जमा केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर, भटउमरा, माळेगाव, सावंगा जहाँगीर, पांडवउमरा, बिटोडा तेली, काजळंबा, खरोळा, जांभरूण महाली, ब्राह्मणवाडा, गोंडेगाव, आसोला जहाँगीर, साखरा, फुलसाखरा, काकडदाती, कोंडाळा झामरे, सुराळा, काटा, तोरनाळा, सोयता, भोयता, कळंबा महाली, किनखेडा, चिखली, धानोरा, सुपखेला, तांदळी शेवई, दुधखेडा, पार्डी आसरा, देगाव, ब्रह्म, कानडी, शेलगाव, बाभूळगाव, बोरी, मसला, फाळेगाव, जांभरूण जहाँगीर या गावांमधील नुकसानभरपाईस पात्र ४२00 शेतकर्यांना प्रती हेक्टर ४७८८ रुपये याप्रमाणे १ कोटी १६ लाख रुपये मंजूर होऊन, सदर रक्कम त्या-त्या शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित कारंजा, मानोरा या तालुक्यांमधीलही आठ हजारांच्या आसपास शेतकर्यांना नुकसानभरपाई मंजूर होऊन सदर रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आर्थिक अडचणीतील शेतकर्यांना ‘आधार’!
शेतमालाला अपेक्षित दर मिळणे दुरापास्त झाल्याने शेतकर्यांची परवड सुरू असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोयाबीनपाठोपाठ तुरीच्या दरातही झालेली विक्रमी घसरण आणि चालू हंगामात पावसाअभावी संकटात सापडलेली पीक परिस्थिती. अशा बिकटप्रसंगी शासनाकडून २0१४-१५ आणि २0१५-१६ मधील तुरीची नुकसानभरपाई मिळाल्याने शेतकर्यांची सोय झाली आहे.