‘वॉटर कप’नंतर आता ‘समृध्द गाव स्पर्धा’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:39 PM2020-01-18T12:39:07+5:302020-01-18T12:42:02+5:30

शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या धर्तीवर राज्यात आता ‘समृध्द गाव स्पर्धा‘ सुरू केली आहे.

After 'Water Cup' now 'Samrudh Gaon Spardha' | ‘वॉटर कप’नंतर आता ‘समृध्द गाव स्पर्धा’ 

‘वॉटर कप’नंतर आता ‘समृध्द गाव स्पर्धा’ 

Next
ठळक मुद्दे या स्पर्धेचा कालावधी १८ महिन्यांचा असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या गावांना रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत.गवत आणि शिवारात वृक्ष लागवड यासाठीही या स्पर्धेत प्रयत्न होणार आहे.

- दादाराव गायकवाड  
वाशिम: गत तीन वर्षांत राज्यातील गावे दुष्काळमूक्त करण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धा राबविल्यानंतर आता पाणी फाऊंडेशनने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या धर्तीवर राज्यात आता ‘समृध्द गाव स्पर्धा‘ सुरू केली आहे. या स्पर्धेचा कालावधी १८ महिन्यांचा असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या गावांना रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सातत्याने पडणाºया दुष्काळाला तोंड देण्यासाठी लोकसहभागातुन जलसंधारणाचे काम करण्यासाठी अभिनेता अमीर खान यांच्या संकल्पनेतून वॉटर कप स्पर्धेचे आयोजन मागच्या तीन वर्षात करण्यात आले होते. या स्पर्धेच्या काळात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे पाण्याबाबत जनजागृती झाली होती; मात्र जल बचतीचे महत्व, वृक्षारोपण, मृदा संधारण, शेतकºयांचा आर्थिकस्तर या बाबतीत काम करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊनच पाणी फाऊंडेशनच्यावतीने आता ‘समृद्ध गांव स्पर्धे’चे आयोजन केले आहे. यात राज्यातील ४० तालुक्यातील हजारो गावांची निवडही करण्यात आली असून, सहभागी गावांनी समृध्द गांव स्पर्धेत उत्कृष्ट काम करण्याचे आवाहन पानी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आहे.
 
विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळणार
शेतकºयांना फळबाग लागवड, पीक पध्दती, जलसिंचन, शेती पुरक व्यवसाय, पशुपालन यासाठी सामुहिक प्रशिक्षण पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, तसेच गाव शिवारातील पाळीव पशुसाठी गवताची सोय नसल्याने जनावरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गवत आणि शिवारात वृक्ष लागवड यासाठीही या स्पर्धेत प्रयत्न होणार आहे.
 
  वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवरच आता राज्यात पाणी फाऊंडेशनच्यावतीने शेतकºयांचा विकास साधण्यासाठी ‘समृद्ध गाव स्पर्धा’ आयोजित केली आहे. या स्पर्धेची अधिकृत घोषणा लवकरच पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आणि सिने अभिनेता आमिर खान करणार असून, त्याचवेळी स्पर्धेचा कालावधीही निश्चित होणार आहे.
-रविंद्र लोखंडे
कारंजा तालुका समन्वयक
समृद्ध गाव स्पर्धा (पाणी फाऊंडेशन)

 

Web Title: After 'Water Cup' now 'Samrudh Gaon Spardha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.