डव्हा यात्रोत्सवानंतर साचलेला कचरा विद्यार्थ्यांनी केला साफ; कृतितून स्वच्छतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 05:17 PM2018-02-01T17:17:42+5:302018-02-01T17:19:56+5:30
मालेगाव: कचरा साफ करण्यासाठी डॉ.विठ्ठलराव जोगदंड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांनी तीर्थक्षेत्र डव्हा यात्रेचे मैदान गाठले व पूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण साफसफाई केली.
मालेगाव: तालुक्यातील डव्हा येथे नाथ नंगे महाराजांचा यात्रोत्सव संपन्न झाला. या यात्रोत्सवात ३० एकर क्षेत्रावर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर परिसरात झालेला कचरा साफ करण्यासाठी डॉ.विठ्ठलराव जोगदंड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांनी तीर्थक्षेत्र डव्हा यात्रेचे मैदान गाठले व पूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण साफसफाई केली.
डव्हा यात्रेत महाप्रसादासाठी १० हजारांवर भाविक आले होते. या सर्वांना संस्थानच्यावतीने शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर भाविकांनी टाकलेल्या पत्रावळी, प्लास्टिक ग्लास, कागदामुळे परिसरात घाण, कचरा पसरला होता. हा सर्व कचरा जोगदंड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोळा करून त्याची विल्हेवाट लावत. परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता अभियानाचे आयोजन प्राचार्य प्रकाश कापुरे यांचे मार्गदर्शनात करण्यात आले. यामध्ये प्राध्यापक अंजली काटेकर, प्रा. विष्णू घोळवे, प्रा. श्रीधर पेटकर, अशोक अवचार, राजिव राऊत, स्वप्नील लांडकर यांच्यासह विद्यालयाच्या कर्मचाºयांनीही सहभाग घेतला होता. विद्यालयाच्या या कृतीची श्रीनाथ मंगे महाराज संस्थानचे अध्यक्ष बाबुराव घुगे व इतरांनी प्रशंसा केली. सदर उपक्रमास विद्यार्थी आकाश सोभागेसह दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग स्वयंस्फूर्तीन सहभाग घेतला.