अंगणवाडी कर्मचा-यांचे धरणे आंदोलन
By admin | Published: March 22, 2017 03:01 AM2017-03-22T03:01:02+5:302017-03-22T03:01:02+5:30
विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरूवात.
वाशिम, दि.२१- विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून धरणे आंदोलनाला सुरूवात केली. दुसर्या दिवशीही धरणे आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी व बालवाडी कर्मचार्यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते; मात्र असा कोणताही निर्णय न घेतल्याचा आरोप करीत अंगणवाडी कर्मचार्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली. अंगणवाडी सेविकांना पाच हजार रुपये, मिनी अंगणवाडीसेविकांना तीन हजार २00 रुपये, मतदनीस कर्मचार्यांना दोन हजार ५00 रुपये असे मानधन दिले जाते. महागाईच्या काळात सदर मानधन अतिशय तोकडे असून, मानधनात वाढ करण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने शासनाकडे केली होती. त्यानुसार अर्थसंकल्पीय सभेत यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते; मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ३0 मार्चपूर्वी यावर निर्णय घ्यावा अन्यथा १ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला.