पाणीटंचाईचा प्रश्न मिटविण्यासाठी महामार्गावर ठिय्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:29 PM2018-06-19T18:29:38+5:302018-06-19T18:29:38+5:30
मंगरूळपीर (वाशिम): शहरात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना लोकप्रतिनिधी व प्रशासनाला त्याचे काहीच देणेघेणे राहिलेले नाही.
मंगरूळपीर (वाशिम): शहरात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना लोकप्रतिनिधी व प्रशासनाला त्याचे काहीच देणेघेणे राहिलेले नाही. दरम्यान, यापुढे पाणीटंचाई जाणवू नये, हा प्रश्न कायमचा मिटावा, या मागणीसाठी समाजसेवक मिलींद इंगोले यांनी १९ जून रोजी महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.
मंगरूळपीर नगर पालिकेने जलसंधारणाच्या कुठल्याच प्रभावी योजना अद्यापपर्यंत राबविलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा संपूर्ण जलस्त्रोत कोरडे होवून शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. याच प्रश्नावर मिलींद इंगोले यांनी भर पावसात महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. असे असताना एकाही अधिकाºयाने आंदोलनाला साधी भेटही दिली नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी ठाणेदार जायभाये यांनी आंदोलनस्थळी धाव घेवून आंदोलकर्त्याची समजूत काढली व त्यांच्या मागण्या तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर इंगोले यांनी आपले आंदोलन मागे घेतले.