शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केनवड येथे रास्ता रोको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 05:32 PM2019-09-09T17:32:11+5:302019-09-09T17:32:31+5:30

शेतकºयांनी ९ सप्टेंबर रोजी मालेगाव ते मेहकर मार्गावरील केनवड येथे रास्ता रोको आंदोलन केले.

agitation at Kenwad for farmers' demands! | शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केनवड येथे रास्ता रोको !

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केनवड येथे रास्ता रोको !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : केनवड परिसरातील अनेक शेतकºयांना कर्जमाफी, पीक कर्ज पुनर्गठणाचा  लाभ मिळाला नसल्याने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी ९ सप्टेंबर रोजी मालेगाव ते मेहकर मार्गावरील केनवड येथे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. 
शेतकºयांसाठी दोन वर्षांपूर्वी पीककर्ज माफीची घोषणा झालेली आहे. केनवड परिसरातील अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा केनवडच्या लाभार्थी शेतकºयांना कर्जमाफीची प्रतिक्षा कायम आहे. शेकडो खातेधारक शेतकºयांनी या शाखेमधून पीक कर्ज, शेती विषयक तसेच वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठी खाते काढले आहेत. शासनाने दिलेल्या कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थी असुन सुद्धा अनेकांचे खाते ‘निल’ दाखवित नाहीत. तालुका उपनिबंधक कार्यालय यादी व बँक स्टेटमेंट यामध्ये तफावत असणे,  अनुदान रक्कम, बचत रक्कम असलेली खाते गोठवणे, परस्पर इंशुरन्स कापणे, शेतकºयांचे संमती शिवाय कर्जाचे पुनर्गठण आदीसंदर्भात सविस्तर चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघर्ष संघटनेने २० आॅगस्ट रोजी केली होती. मात्र, न्याय न मिळाल्याने ९ सप्टेंबर रोजी संघटनेचे अध्यक्ष राजू वानखेडे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष गणेश अढाव यांच्या नेतृत्वात केनवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पात्र शेतकºयांना कर्जमाफी, कर्ज पुनर्गठणाचा लाभ मिळालाच पाहिजेत, शेतकºयांचे संमती शिवाय कर्जाचे पुनर्गठण याप्रकरणी संबंधितांविरूद्ध कारवाई करून शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी केली.
दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत पीककर्जाबाबत तक्रार असलेल्या शेतकºयांच्या प्रकरणाची वैयक्तिक चौकशी करणार असून, यासाठी ९ सप्टेंबरपासून केनवड शाखेत विशेष अधिकारी नियुक्ती करण्याचे लेखी आश्वासन एसबीआयच्या क्षेत्रीय प्रबंधकांनी दिले. यामुळे दुपारी २ वाजतादरम्यान रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोको आंदोलनामुळे सकाळी ११ ते २ वाजतादरम्यान मेहकर ते मालेगाव या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाली होती.

 

Web Title: agitation at Kenwad for farmers' demands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.