इंधन दरवाढीविरोधात रिसोड येथे ‘दे धक्का’ आंदोलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 04:05 PM2018-06-04T16:05:42+5:302018-06-04T16:05:42+5:30

रिसोड - डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅसच्या दरात सातत्याने असलेल्या दरवाढीविरोधात भारिप-बमसं शाखा रिसोडच्यावतीने शहराध्यक्ष प्रदीप खंडारे व तालुकाध्यक्ष केशव सभादिंडे यांच्या नेतृत्त्वात ४ जून रोजी रिसोड येथे दे धक्का आंदोलन करण्यात आले.

agitation at Risod against fuel price hike! | इंधन दरवाढीविरोधात रिसोड येथे ‘दे धक्का’ आंदोलन !

इंधन दरवाढीविरोधात रिसोड येथे ‘दे धक्का’ आंदोलन !

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सिव्हिल लाईन, तहसिल कार्यालयावर मोटार सायकलला दे धक्का आंदोलन क रण्यात आले. भारिप-बमसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित  होते.यावेळी नायब तहसिदार देवळे यांना निवेदन देण्यात आले.

रिसोड - डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅसच्या दरात सातत्याने असलेल्या दरवाढीविरोधात भारिप-बमसं शाखा रिसोडच्यावतीने शहराध्यक्ष प्रदीप खंडारे व तालुकाध्यक्ष केशव सभादिंडे यांच्या नेतृत्त्वात ४ जून रोजी रिसोड येथे दे धक्का आंदोलन करण्यात आले.

डिझेल, पेट्रोल व घरगुती गॅसच्या दरात भरमसाठ वाढ होत आहे. यामुळे वाहतुकीच्या खर्चातही वाढ होत असल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था महागल्याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत आहे. निवडणुकीदरम्यान दिलेले अच्छे दिनचे स्वप्न अधूरेच आहे. बेरोजगारी, फसलेली नोटबंदी, फसलेली कर्जमाफी, शेतमालाचे पडलेले बाजारभाव आणि अशातच झालेली इंधन दरवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. इंधन दरवाढीचा निषेध म्हणून भारिप-बमसं रिसोड शहर व तालुक्याच्यावतीने शहराध्यक्ष प्रदीप खंडारे व तालुकाध्यक्ष केशव सभादिंडे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सिव्हिल लाईन, तहसिल कार्यालयावर मोटार सायकलला दे धक्का आंदोलन क रण्यात आले. यावेळी डॉ. रवींद्र मोरे पाटील, विश्वनाथ पारडे, गिरधर शेजूळ, गौतम मोरे, अब्दुल मुनाफ, डॉ. जावेद खान, अशोक अंभोरे, गौतम धांडे, मुनवर खत्री, ख्वाजाभाई, वसीम पठाण, शेख आकीब, जाहुर खान, रामेश्वर सरकटे, सुरेश इंगोले, आक्रम खान, अजय तिडके, भागवत जुमडे, सचिन म्हस्के, दिलीप नवघरे, गजानन खंडारे, विनोद भालेराव, लक्ष्मण कापुरे यासह भारिप-बमसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित  होते. यावेळी नायब तहसिदार देवळे यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: agitation at Risod against fuel price hike!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.