भेसळयुक्त बियाण्यांची कृषी विभागाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:24 AM2017-08-02T02:24:46+5:302017-08-02T02:25:09+5:30

मंगरूळपीर: महाबीजचे बियाणे भेसळयुक्त असल्याचा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथे आढळून आला होता. याप्रकरणी ‘लोकमत’ने २५ जुलैच्या अंकात ‘पेरले एक, उगवले दुसरेच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन कृषी विभागाचे लक्ष वेधले होते.

Agrarian department intervenes with adulterated seeds | भेसळयुक्त बियाण्यांची कृषी विभागाकडून दखल

भेसळयुक्त बियाण्यांची कृषी विभागाकडून दखल

Next
ठळक मुद्देमहाबीजचे बियाणे भेसळयुक्त असल्याचा प्रकारमंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथे आढळून आला लोकमत’ने २५ जुलैच्या अंकात ‘पेरले एक, उगवले दुसरेच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले

नाना देवळे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर: महाबीजचे बियाणे भेसळयुक्त असल्याचा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथे आढळून आला होता. याप्रकरणी ‘लोकमत’ने २५ जुलैच्या अंकात ‘पेरले एक, उगवले दुसरेच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन कृषी विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल कृषी विभागाने १ ऑगस्ट रोजी संबंधित शेतकर्‍यांच्या शेताला भेट देवुन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतात अन्य प्रकारचे ७0 टक्के बियाणे असल्याचे कृषी विभागाच्या चमूला आढळुन आले.
चांभई येथील गोविंदा मोतीराम भगत या शेतकर्‍याने यंदाच्या हंगामात पेरणीसाठी खरेदी-विक्री समितीमधून  ८  जून २0१७ रोजी अनुदानाचे तीन बॅग सोयाबीन बियाणे विकत घेतले. त्यांनी महाबिजच्या ९३0५ या वाणाची पेरणी केली. काही दिवसांनी बियाणे चांगले उगवले. परंतु सुरुवातीला रोपे लहान असतांना त्यांना त्यामध्ये मिश्र वाण असल्याचे दिसले नाही. पंरतु रोपे मोठी झाल्यानंतर काही रोपांची पाने लांबट असल्याचे दिसून आले तर काही पाने गोलसर असल्याचे दिसून आले. या सोयाबीन बियाण्यासह दुसर्‍या वाणाचेही रोपे असल्याचे आढळुन आले. 
याबाबत शेतकर्‍याने संबंधित विभागाकडे तक्रारही नोंदविली होती. तसेच यासंदर्भात ‘लोकमत’ने २५ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करुन कृषी विभागाचे लक्ष वेधले. याची दखल घेत कृषी विभागाने १ ऑगस्ट रोजी शेतकरी गोविंदा मोतीराम भगत यांच्या चांभई येथील शेतास भेट देवुन उगविलेल्या सोयाबीन बियाण्याची पाहणी केली. यावेळी कृषी शास्त्रज्ञ भरत गिते, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, पंचायत समिती कृषी अधिकारी प्रल्हाद शेळके, महाबिज सहाय्यक क्षेत्र अधिकारी एस.बी.नवगण, कृषी सहाय्यक निरंजन महल्ले उपस्थित होते. 
या चमुने केलेल्या पाहणीत सोयाबीनच्या पिकात शेतकर्‍याने मागितलेल्या ९३0५ या वाणाचे प्रमाण केवळ ३0 टक्के तर इतर वाण ७0 टक्के वाण असल्याचे आढळुन आले. ९३0५ वाण लवकर येणारे आहे. येत्या महिन्याभरात ९३0५ वाण काढणीवर येईल तर इतर वाणाची झाडे हिरवी राहतील. 
यामध्ये सोंगणी करतांना पंचाईत होणार आहे. त्यामुळे एक लाख रुपये भरपाई देण्याची मागणी गोविंद भगत यांनी यावेळी केली.
 

Web Title: Agrarian department intervenes with adulterated seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.