शेतीपुरक व्यवसायांचा प्रचार-प्रसार व्हावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 07:48 PM2017-10-10T19:48:07+5:302017-10-10T19:51:23+5:30
वाशिम: पारंपरिक पिके सर्वार्थाने निसर्गावर, पर्जन्यमानावर विसंबून असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदलांमुळे नापिकीचे संकट उद्भवत आहे. अशा स्थितीत शेतकºयांना किमान उत्पादन मिळावे, यासाठी शेतीपुरक व्यवसायांचा युद्धस्तरावर प्रचार-प्रसार करून शेतकºयांना त्यासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत (आत्मा) ९ आॅक्टोबरला आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांमुळे सिंचन सुविधेत वाढ झाली आहे. अशाठिकाणी जनावरांसाठी बारमाही चारा उपलब्ध होऊ शकतो. अशा गावांची निवड करून तेथील शेतकºयांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. याकरिता शेतकºयांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या. त्याचबरोबर सोयाबीन, तुरीच्या पिकाला पर्याय उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ‘आत्मा’मार्फत पिक प्रात्यक्षिके घेऊन मार्गदर्शन करावे. जिल्ह्यातील यशस्वी शेतकरी, शेतीपूरक उद्योगांचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करावा, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.