आसेगाव परिसरात शेती मशागतीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:38 AM2021-03-28T04:38:41+5:302021-03-28T04:38:41+5:30
डिझेलच्या दरात सतत होणाऱ्या वाढीमुळे शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने करावयाची मशागत महागली आहे. तसेच, शेतमाल बाजार समितीपर्यंत नेणाऱ्या वाहतुकीचा दर ...
डिझेलच्या दरात सतत होणाऱ्या वाढीमुळे शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने करावयाची मशागत महागली आहे. तसेच, शेतमाल बाजार समितीपर्यंत नेणाऱ्या वाहतुकीचा दर वाढल्याने ‘इकडे आड, तिकडे विहीर’ या कात्रीत बळीराजा सापडला आहे.
८० टक्के शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरचा वापर
सद्यःस्थितीत पेरणीपूर्वीचा हंगाम सुरू असल्याने व उन्हाळ्यात शेती चांगली भाजल्यास मृग नक्षत्रात पडणारा पाऊस नांगरणीमुळे शेतात मुरला जातो. या कारणाने शेतीची नांगरणी करण्यात शेतकरी व्यस्त आहे. बैलांच्या साहाय्याने नांगरणीऐवजी सध्या ८० टक्के शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करूनच मशागत करतात. गेल्या वर्षी दोन हजार रुपये असलेला ट्रॅक्टरच्या एकरी नांगरणीचा दर यंदा दोन हजार ५०० रुपये इतका झाला आहे. निसर्गाच्या विविध अरिष्टांसोबत डिझेल दरवाढीचा फटकादेखील बसत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.