वाशिम येथे कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार कृषी महोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 09:33 PM2018-02-09T21:33:25+5:302018-02-09T21:57:28+5:30

वाशिम : वाशिम येथे २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणा-या जिल्हा कृषी महोत्सवाच्या ठिकाणामध्ये बदल झाला असून, आता सदर महोत्सव जिल्हा क्रीडा संकुलऐवजी वाशिम शहरालगतच असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रामध्ये होणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने आयोजित या महोत्सवाचे उदघाटन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. 

Agricultural Festival to be held in the presence of Agriculture Minister at Washim. | वाशिम येथे कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार कृषी महोत्सव!

वाशिम येथे कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार कृषी महोत्सव!

Next
ठळक मुद्दे२१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान पाच दिवस चालणार महोत्सव महोत्सवाच्या ठिकाणामध्ये बदल

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : वाशिम येथे २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणा-या जिल्हा कृषी महोत्सवाच्या ठिकाणामध्ये बदल झाला असून, आता सदर महोत्सव जिल्हा क्रीडा संकुलऐवजी वाशिम शहरालगतच असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रामध्ये होणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने आयोजित या महोत्सवाचे उदघाटन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. 
महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड राहणार आहेत. यावेळी ऊर्जा, पर्यटन राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे सह पालकमंत्री मदन येरावार, नगरविकास, गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषद कृषी सभापती विश्वनाथ सानप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, विभागीय कृषि सहसंचालक एस. के. नागरे आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रयोगशील शेतक-यांना प्रेरणा म्हणून तसेच इतर शेतकºयांसमोर आदर्श निर्माण व्हावा यासाठी विविध ‘स्टॉल’ राहणार आहेत. कृषी प्रदर्शन, शेतकरी व महिला बचत गटांच्या मालांचे तसेच सेंद्रिय शेती मालाचे प्रदर्शन तसेच शेतकºयांसाठी विविध योजना व उपक्रमांची माहिती, संशोधित कृषि तंत्रज्ञान, शेतीतील नाविन्यपूर्ण बाबी, शेतक-यांचे अनुभव, विक्री व्यवस्थापन आदीबाबत माहितीपर व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. या महोत्सवादरम्यान महोत्सव स्थळी शेतकरी बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध केली जाणार आहे. वाशिम जिल्हा कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. दिनकर जाधव यांनी शुक्रवारी केले.

Web Title: Agricultural Festival to be held in the presence of Agriculture Minister at Washim.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.