वाशिम जिल्ह्यात कृषीपंप जोडणी रखडली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 02:18 PM2018-06-18T14:18:10+5:302018-06-18T14:18:10+5:30
वाशिम : विशेष घटक योजनेंतर्गतच्या जवळपास ३०० सिंचन विहिरीवर अद्याप कृषीपंप जोडणी झाली नाही. संबंधित लाभार्थींना तातडीने कृषीपंप जोडणी देण्याची मागणी रिपाइंचे (आ) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी १८ जून रोजी महावितरण व जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली.
वाशिम : विशेष घटक योजनेंतर्गतच्या जवळपास ३०० सिंचन विहिरीवर अद्याप कृषीपंप जोडणी झाली नाही. संबंधित लाभार्थींना तातडीने कृषीपंप जोडणी देण्याची मागणी रिपाइंचे (आ) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी १८ जून रोजी महावितरण व जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली.
विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्यातील जवळपास १८०० लाभार्थींना कृषीपंप जोडणी मिळणे अपेक्षीत आहे. अद्याप ३०० लाभार्थींना कृषीपंप जोडणी देण्यात आली नाही. गत चार वर्षांपासून हा तिढा कायम आहे. यामुळे मागासवर्गातील शेतकरी लाभार्थींना शेती सिंचनाखाली आणणे कठीण जात आहे. महावितरणकडे मागणी करूनही कृषीपंप जोडणी देण्यास विलंब होत असल्याचा आरोप तेजराव वानखेडे यांनी केला. १८०० पैकी साधारणत: १५०० कृषीपंप जोडण्या पूर्ण झाल्या असून, ३०० कृषीपंप जोडण्या रखडल्या आहेत. सदर कृषीपंप जोडण्या पूर्ण झाल्या असत्या, तर शेतकºयांना गतवर्षी सिंचन करणे शक्य झाले असते. किमान यावर्षी तरी सिंचन शक्य व्हावे यासाठी कृषीपंप जोडणी पूर्ण करावी, अशी मागणी वानखेडे यांनी केली.
तसेच नवीन वीजजोडणी घ्यायची असेल तर किमान सहा महिने लागतात. या किचकट प्रक्रियेला फाटा देत महावितरणने २४ तासांत वीजजोडणी देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. मात्र, या उपक्रमाची अंमलबजावणी अनेक ठिकाणी होत नसल्याचे दिसून येते. ‘मोबाईल अॅप’ आणि ‘आॅनलाईन’ प्रक्रियेचा आधार घेत जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा येथून या उपक्रमास सुरूवात करण्यात आली होती. यानुसार, ग्राहकांना वीज मागणी अर्ज देण्याची गरज नाही. अर्ज आॅनलाईन तथा मोबाईल अॅपव्दारे करता येतो. मात्र, काही ठिकाणी अद्याप २४ तासांत वीजजोडणी मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. याकडे महावितरणने लक्ष पुरवून २४ तासांत वीजजोडणी द्यावी, अशी मागणी वानखेडे यांनी केली.