कृषी स्वावलंबन योजना : अर्जासाठी दोन दिवसांची मुदत; संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 04:07 PM2019-09-02T16:07:27+5:302019-09-02T16:07:37+5:30

ग्रामसेवकांच्या संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळत नसल्याने शेतकरी लाभार्थींची गोची झाली  आहे.

Agricultural Self-Help Scheme: Two-day application period; Gram Sabha does not get resolution | कृषी स्वावलंबन योजना : अर्जासाठी दोन दिवसांची मुदत; संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळेना !

कृषी स्वावलंबन योजना : अर्जासाठी दोन दिवसांची मुदत; संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळेना !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सन २०१९-२० या वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना ४ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, ग्रामसेवकांच्या संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळत नसल्याने शेतकरी लाभार्थींची गोची झाली  आहे.
अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील शेतकºयांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांसाठी  बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविली जात आहे. या योजनेतून नविन विहीरीकरीता २.५० लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, विद्युत जोडणी व सौर कृषि पंपासाठी १० हजार रुपये, विद्युत पंपसंचसाठी २० हजार रुपये, सुक्ष्म सिंचनाकरीता ९० टक्के मर्यादेत ठिंबक संचासाठी ५० हजार रुपये व तुषार संचासाठी २५ हजार रुपये पूरक अनुदान, शेततळ्याच्या अस्तरीकरणसाठी १ लाख रुपये इत्यादी विविध बाबींसाठी अनुदान मर्यादेत पॅकेज स्वरुपात लाभ देण्यात येणार आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेल्या अनुसूचित जातीचे शेतकरी तसेच वनपट्टेधारक आदीवासी शेतकरी, दिव्यांग व महिला शेतकºयांची प्राधान्याने निवड करण्यात येईल.या योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा ४ सप्टेंबर २०१९ पर्यंत उपलब्ध राहणार आहे. परंतू, जिल्ह्यात ९ आॅगस्टपासून ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन, त्यानंतर २२ आॅगस्टपासून ग्रामसेवक बेमुदत कामबंद आंदोलनावर आहे. परिणामी, ग्रामसभेचा ठराव मिळत नसल्याने पात्र शेतकरी लाभार्थींना अर्ज सादर करणे अशक्य झाले आहे. या योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहू नये म्हणून अर्जासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.

Web Title: Agricultural Self-Help Scheme: Two-day application period; Gram Sabha does not get resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.