वाशिम जिल्ह्यातील ३१६ कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:14 PM2017-11-04T14:14:12+5:302017-11-04T14:16:25+5:30
जिल्ह्यातील ३१६ कृषीसेवा केंद्रांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यामधील पाच कृषी सेवा केंद्रांच्या निलंबनाचा प्रस्तावही कृषी विकास अधिकाºयांकडे सादर करण्यात आला.
वाशिम: यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या किटकनाशक फवारणी दुर्घटनेच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ३१६ कृषीसेवा केंद्रांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यामधील पाच कृषी सेवा केंद्रांच्या निलंबनाचा प्रस्तावही कृषी विकास अधिकाºयांकडे सादर करण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याने २३ शेतकºयांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आणि या गंभीर प्रकाराची दखल घेत वाशिम जिल्हाधिकाºयांनी आपल्या जिल्ह्यात अशी घटना घडू नये या उद्देशाने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व कृषीसेवा केंद्रांची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाºयांना दिल्या. त्या अनुषंगाने कृषी विकास अधिकाºयांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांमार्फत जिल्ह्यातील कृषीसेवा केंद्रांची वेगाने तपासणी सुरू करण्यात आली. या मोहिमेत मालेगाव तालुक्यात नियमांचे उल्लंघन करणाºया पाच कृषीसेवा केंद्रांचे परवाने कृषी विकास अधिकाºयांनी तात्काळ निलंबितही केले. त्यानंतर जिल्ह्यातील ३१६ कृषीसेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. यामधील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव कृषी विकास अधिकाºयांकडे सादर करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण ६७९ कृषीसेवा केंद्रांपैकी ६० टक्के कृषीसेवा कें द्रांची तपासणी जिल्हा परिषदेंतर्गत येणाºया अधिकाºयांमार्फत करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांकडून ३१६ कृषीसेवा कें द्रांची पाहणी करण्यात आली. त्यांच्या वाट्यावर असलेल्या ६० टक्क्यांपैकी आता मोजकीच कृषीसेवा केंद्र उरली असून, यानंतर राज्यस्तरीय पथकाकडून त्यांच्या वाट्यावरच्या ४० टक्के कृषीसेवा केंद्रांची पाहणी करण्यात येणार आहे.