महिलांसाठी कृषी प्रशिक्षण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:31 AM2021-06-04T04:31:21+5:302021-06-04T04:31:21+5:30
अनुदान अभावी रखडली घरकुले वाशिम : वनोजा, हराळ, केनवड परिसरात अनुसूचित जाती मधील ७५ लाभार्थ्यांना रमाई घरकूल योजनेंतर्गत घरकूल ...
अनुदान अभावी रखडली घरकुले
वाशिम : वनोजा, हराळ, केनवड परिसरात अनुसूचित जाती मधील ७५ लाभार्थ्यांना रमाई घरकूल योजनेंतर्गत घरकूल मंजूर करण्यात आले ; परंतु सात महिने उलटत आले तरी या लाभार्थींच्या खात्यात घरकूल अनुदानाचा निधी जमा करण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे रखडली आहेत, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
निर्जंतुकीकरणासाठी निधीची प्रतीक्षा
वाशिम : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना उपाययोजनेसाठी पुरेसा निधी मिळाला नाही.
कोरोनाबाबत गावात जनजागृती
वाशिम : चिखली, कवठा, व्याड, घोटा परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक प्रमाणात पसरू नये म्हणून आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वतीने गत दोन दिवसात गावात फिरून जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.