कृषी कायदे, महागाईविरोधात कॉंग्रेसचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:43 AM2021-04-01T04:43:17+5:302021-04-01T04:43:17+5:30

यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ...

Agriculture Act, Congress fast against inflation | कृषी कायदे, महागाईविरोधात कॉंग्रेसचे उपोषण

कृषी कायदे, महागाईविरोधात कॉंग्रेसचे उपोषण

Next

यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकºयांचे आंदोलन सुरू आहे; मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. याऊलट शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसने अनेकवेळा संसदेत व रस्त्यांवर उतरून आंदोलने केली; परंतु सरकार याबाबत ठोस निर्णय घेण्यास असमर्थ ठरले. दरम्यान, वाढलेले दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा व शेतकºयांचे हित नसलेले कृषी कायदे तत्काळ रद्द करावे, या मागणीसाठी जिल्हा कॉंग्रेस कमेटीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. आंदोलनात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव सरनाईक, जि.प.अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, किसनराव मस्के, अ‍ॅड. प्रकाश इंगोले, राजू चौधरी, दिलीप भोजराज, प्रकाश राठोड, नंदा गणोदे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Agriculture Act, Congress fast against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.