कृषिदूतांचे माती परीक्षण व कंपोस्ट खत विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:46 AM2021-08-21T04:46:30+5:302021-08-21T04:46:30+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आकाश शालीग्राम घायाळ याने कृषी ...

Agriculture envoys guide farmers on soil testing and composting | कृषिदूतांचे माती परीक्षण व कंपोस्ट खत विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषिदूतांचे माती परीक्षण व कंपोस्ट खत विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

googlenewsNext

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आकाश शालीग्राम घायाळ याने कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत १० ऑगस्ट रोजी अनसिंग येथे शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्याची पद्धत व त्यामुळे होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना माती परीक्षण व कंपोस्ट खाताविषयी माहिती मिळावी व शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता या कार्यक्रमाला भागवत दुधाट ऋषिकेश कदम, प्रवीण जाधव, गणेश धोंडे व इतर शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. जी. एस. वासू, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. टी. कव्हर व विषय शिक्षक प्रा. एस. टी. जाधव या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Agriculture envoys guide farmers on soil testing and composting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.