कृषी अधिकाऱ्यांकडून वाशिम शहरातील कृषीसेवा कें द्रांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 04:10 PM2019-08-02T16:10:38+5:302019-08-02T16:10:45+5:30
वाशिम: पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी गुरुवारी शहरातील कृषीसेवा केंद्रांची तपासणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी गुरुवारी शहरातील कृषीसेवा केंद्रांची तपासणी केली. यात दोन कृषी सेवा केंद्रांतील किटकनाशक व तणनाशके मिळून ९७ लिटर साठ्यावर विक्रीबंदचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत त्रुटींची पूर्तता करून खुलासा सादर करण्यास संबंधित कृषीसेवा केंद्रांना ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
वाशिम पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनी गुुुरुवारी शहरातील काही कृषीसेवा केंद्रांना भेटी देऊन तपासणी केली. यात दोन कृृषी सेवा केंद्रांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यात परवान्यात समाविष्ठ नसलेली उत्पादने विक्री करणे, मासिक साठा अहवाल सादर न करणे, साठा फलक अद्यायावत न ठेवणे, आदि कारणांचा समावेश असून, या प्रकरणी संबंधित दोन्ही कृषी सेवा केंद्रातील ९७ लिटर कीटकनाशक व तणनाशकांस विक्री बंद आदेश देण्यात आला आहे. संबंधित कृषी सेवा केंद्रांना त्रुटींची पूर्तता व खुलासा सादर करण्यास ७ दिवसाची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत खुलासा व कायदेशीर बाबीची पूर्तता न केल्यास सदर विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे कृषी अधिकाºयांनी सांगितले.
(प्रतिनिधी)