कृषी विद्यार्थ्यांनी पटविले जलशुध्दीकरणाचे महत्त्व !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:48 AM2021-08-20T04:48:20+5:302021-08-20T04:48:20+5:30
कृषी महाविद्यालय उमरखेडच्या सातव्या सत्रातील कृषिदूत किरण गोपाजी नागरे यांनी पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण कशाप्रकारे करावे याबाबतचे प्रात्यक्षिक ग्रामस्थांना ...
कृषी महाविद्यालय उमरखेडच्या सातव्या सत्रातील कृषिदूत किरण गोपाजी नागरे यांनी पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण कशाप्रकारे करावे याबाबतचे प्रात्यक्षिक ग्रामस्थांना करून दाखविले. पावसाळ्यात गावातील पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या विहिरीमध्ये दूषित पाणी जमा होत असते. त्यामुळे जेव्हा नळाच्या माध्यमातून या पाण्याचा घरोघरी पिण्यासाठी पुरवठा केला जातो. तेव्हा दुषित पाण्यामुळे साथीचे अनेक रोग पसरतात. नकळत दूषित पाणी प्यायला जाते. त्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागते, ही समस्या उद्भवू नये म्हणून पाण्याचे शुद्धीकरण आवश्यक असल्याचे कृषी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना पटवून दिले. हा कार्यक्रम मोहजाबंदी येथील विहिरीवर करण्यात आला. या प्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के. चिंतले, प्रा.आनंद राऊत, प्रा. वाय.एम. वाकोडे व ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी प्रा. सपकाळ यांचे मार्गदर्शन लाभले.