डव्हा येथे एड्स नियंत्रणासंबंधी विद्यार्थ्यांकडून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 03:25 PM2018-12-01T15:25:03+5:302018-12-01T15:26:01+5:30
मालेगाव (वाशिम) : जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एड्स-एचआयव्ही या जीवघेण्या आजाराच्या नियंत्रणासंबंधी तालुक्यातील डव्हा येथे विद्यार्थ्यांनी शनिवारी रॅली काढून जनजागृती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एड्स-एचआयव्ही या जीवघेण्या आजाराच्या नियंत्रणासंबंधी तालुक्यातील डव्हा येथे विद्यार्थ्यांनी शनिवारी रॅली काढून जनजागृती केली.
तत्पुर्वी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डव्हा येथील डॉ. श्रीमती रुक्मिणीदेवी जोगदंड कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश कापुरे होते. मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचे आय.सी.टी.सी. समुपदेशक विनोद रत्नपारखी, प्रवीण गोरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिपक काळे, क्षयरोग पर्यवेक्षक रामेश्वर साळुंके, युवा मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर वनस्कर, सचिव चंद्रकांत सहस्त्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रत्नपारखी म्हणाले, की नागरिकांमध्ये एड्सबाबत जनजागृती होण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न व्हायला हवे. एड्सबाबतचे समज आणि गैरसमज याबाबत सर्वांनी जाणून घेवून दुष्परिणामांबाबत जागर झाला तरच एड्सला आळा बसेल, असे त्यांनी सांगितले. क्षयरोग पर्यवेक्षक रामेश्वर साळुंके यांनी यावेळी क्षयरोगाविषयी माहिती माहिती दिली. त्यानंतर गावातून भव्य स्वरूपात जनजागृती रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कांबळे यांनी केले. अवचार यांनी आभार मानले.