जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह फुटला; लाखो लीटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 05:39 PM2019-06-12T17:39:55+5:302019-06-12T17:40:18+5:30
मानोरा (वाशिम): जीवन प्राधीकरणच्या पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह बुधवारी फुटला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम): जीवन प्राधीकरणच्या पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह बुधवारी फुटला. यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून, आता या योजनेवरील २८ गावांतील पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. तालुक्यातील रतनवाडी गावाजवळ हा प्रकार घडला आहे.
मानोरा तालुक्यात जीवन प्राधीकरणच्यावतीने २८ गावे पाणी पुरवठा योजना राबविण्यात येते. या योजनेवर तालुक्याती २८ गावांची तहान भागविली जाते. गेल्या काही दिवसांपासून आधीच जलवाहिनी जीर्ण असल्याने वारंवार ती फुटून पाणी पुरवठा प्रभावित होत आहेच त्यात बुधवारी या योजनेच्या जलवाहिनीवरील रतनवाडीगावानजिक असलेला एअर व्हॉल्व फुटला. त्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय सुरु झाला असून, या योजनेवर अवलंबून असलेल्या २८ गावांचा पाणी पुरवठा यामुळे प्रभावित झाला आहे. जिल्ह्यातील ३०९ गावांत आधीच पाणीटंचाईची दाहकता तीव्र झाली आहे. त्यात अडाण प्रकल्पात केवळ ४.५७ टक्के जलसाठा उरला असताना आता मानोरा तालुक्यात पाणी पुरवठा योजनेतील या तांत्रिक बिघाडामुळे संबंधित गावांत ग्रामस्थांनाही कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती निर्माण झाली आहे.