वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी ‘अकोला’वारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 08:21 PM2017-11-14T20:21:36+5:302017-11-14T20:24:44+5:30
वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम पूर्ण न झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व वाहतूकदारांना आता योग्यता प्रमाणपत्र तपासणी व नुतणीकरणाकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोल येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर जावे लागणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : परिवहन वाहनांची ब्रेक टेस्ट तपासणी व योग्यता प्रमाणपत्र तपासणी शासकीय मालकीच्या जमिनीवर ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’वर घेणे आवश्यक आहे. वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम पूर्ण न झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व वाहतूकदारांना आता योग्यता प्रमाणपत्र तपासणी व नुतणीकरणाकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोल येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर जावे लागणार नाही.
वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला स्वतंत्र इमारत व ट्रॅक नाही. नवीन इमारत व ट्रॅकचे काम सुरू असून, अद्याप ट्रॅकचे काम पूर्ण झाले नाही. शासनाच्या परिपत्रकान्वये आता परिवहन वाहनांची ब्रेक टेस्ट तपासणी व योग्यता प्रमाणपत्र तपासणी शासकीय मालकीच्या जमिनीवर ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’वर घेणे आवश्यक आहे. वाशिम येथे ही सुविधा उपलब्ध नसल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून वाशिम जिल्ह्यातील वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र तपासणी व नुतणीकरणासाठी अकोला येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे जावे लागणार आहे. तत्पूर्वी वाहनधारकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम येथे विहित शुल्काचा भरणा करुन व शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. त्यानंतर वाहने अकोला येथे घेऊन जावी लागणार आहेत. अकोला येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर योग्यता प्रमाणपत्र तपासणी व नुतणीकरण करण्याकरीता वाशिम कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वाशिम जिल्ह्यातील वाहनधारकांनी योग्यता प्रमाणपत्र तपासणी व नुतणीकरण करण्याकरीता वाहने अकोला येथे न्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले. वाशिम येथील सुविधा उपलब्ध झाल्यानंतर वाशिम येथेच योयता प्रमाणपत्र तपासणी व नुतणीकरण केले जाणार आहे, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.