अकोला-तिरुपती-अकोला एक्स्प्रेसला महिनाभराची मुदतवाढ

By दिनेश पठाडे | Published: August 23, 2023 03:43 PM2023-08-23T15:43:44+5:302023-08-23T15:44:08+5:30

सणासुदीच्या काळात तिरुपतीला जाण्यासाठी वाशिमकारांची सोय होणार आहे.

Akola-Tirupati-Akola Express extended by one month | अकोला-तिरुपती-अकोला एक्स्प्रेसला महिनाभराची मुदतवाढ

अकोला-तिरुपती-अकोला एक्स्प्रेसला महिनाभराची मुदतवाढ

googlenewsNext

वाशिम : अकोला-वाशिम-पूर्णा मार्गावरुन धावणाऱ्या अकोला-तिरुपती-अकोला विशेष एक्स्प्रेसला आणखी महिनाभराची  मुदतवाढ देण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे सणासुदीच्या काळात तिरुपतीला जाण्यासाठी वाशिमकारांची सोय होणार आहे.

अतिरिक्त गर्दी आणि प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेकडून मुदत संपलेल्या रेल्वेगाड्यांना  मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जातो. त्यानुसार २५ ऑगस्टपर्यंत नियोजित असलेली गाडी क्रमांक ०७६०५ तिरुपती-अकोला विशेष एक्स्प्रेस १ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर दरम्यान धावणार आहे. ही रेल्वे प्रस्थान स्थानकावरुन अर्थात तिरुपतीवरुन दर शुक्रवारी दुपारी १२:३० वाजता निघेल दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४९ वाजता वाशिम स्थानकावरुन पोहचून अकोलाकडे मार्गस्थ होईल. 

२६ ऑगस्टपर्यंत नियोजित वेळेनुसार धावणारी  गाडी क्रमांक ०७६०६ अकोला-तिरुपती विशेष एक्स्प्रेसला ३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान मुदतवाढ मिळाली असून ही गाडी दर शनिवारी अकोला स्थानकावरुन सकाळी ८:१० वाजता सुटेल, वाशिम स्थानकावर सकाळी ९:१९ वाजता पोहचून दुसऱ्या दिवशी तिरुपती स्थानकावर सकाळी ६:२५ वाजता पोहचेल.  दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेकडून सुरु असलेल्या अकोला-तिरुपती-अकोला एक्स्प्रेसला विशेष रेल्वेचा दर्जा असल्याने तिकीट दर अधिक आहे. त्यामुळे इतर प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागत असून या रेल्वेगाडीच विशेष दर्जा काढून रेल्वे नियमित सोडावी, अशी मागणी वाशिमकरांतून होत आहे.
 

Web Title: Akola-Tirupati-Akola Express extended by one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.