अक्षय तृतीयेचा 'शुभ मुहूर्त; पण खरेदीवर विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:48+5:302021-05-14T04:40:48+5:30
जिल्ह्यात ९ मे रोजी सकाळी ७ वाजतापासून १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. यात ...
जिल्ह्यात ९ मे रोजी सकाळी ७ वाजतापासून १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने या ' शुभ ' मुहूर्तावरील ' सोने खरेदीवर विरजण पडणार आहे.
गेल्यावर्षी विवाह करणाऱ्यांना धूमधडाक्यात विवाहाचा बार उडविता आला नसल्याने त्यांनी यावर्षीचे नियोजन केले होते. बऱ्याच वर-वधू कडील मंडळींनी गेल्यावर्षी विवाह सोहळ्याला ब्रेक देऊन यावर्षीचे नियोजन केले होते. अनेकांचे विवाह ठरले असून त्यांनी मुहूर्त पाहून मंगल कार्यालयात बुकिंग केले तर काही आपल्या सोयीनुसार घरगुती विवाह पार पाडण्याच्या तयारीमध्ये आहेत. यावेंळी लग्नाची सोने खरेदी रद्द झाली असून मुहूर्तावर सोने खरेदीचा बेतही फसला आहे. या महिन्यातील विवाहाची तारीख निश्चित केल्यानंतर कडक निर्बंधामुळे तो रद्द करावा लागल्याने पालकांचा झालेला खर्चही वाया गेला आहे. हे कडक निबंध आणखी वाढले तर येत्या दिवसातील सोहळेही रद्द करावे लागणार आहे. या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खेरेदी विक्री बंद असल्याने सुवर्ण व्यावसायिक आणि सुवर्ण कारागीर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.