तालुकानिहाय कार्यशाळेतून ‘महाआवास योजने’चा गजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 06:14 PM2020-12-08T18:14:44+5:302020-12-08T18:16:50+5:30

Washim News जिल्ह्यात तालुकानिहाय कार्यशाळेतून याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

Alarm of 'Maha Awas Yojana' from taluka wise workshop! | तालुकानिहाय कार्यशाळेतून ‘महाआवास योजने’चा गजर!

तालुकानिहाय कार्यशाळेतून ‘महाआवास योजने’चा गजर!

Next

वाशिम : अपूर्ण घरकुलांचे काम पूर्ण करणे, घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी महाआवास योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यात तालुकानिहाय कार्यशाळेतून याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
प्रत्येकाला हक्काचे घर मिळण्यासाठी शासनाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, आदीम आवास, अटल बांधकाम कामगार आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना, ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठीची योजना आदी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत अपूर्ण घरकुलांचे काम पूर्ण करणे, घरकुलासाठी लाभार्थीकडे जागा उपलब्ध नसल्यास सरकारी जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमण असल्यास नियमानुकूल करणे, जागा खरेदीसाठी अनुदानाव्यतिरिक्त बँकांकडून ७० हजार रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे आदी उद्देशातून २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात महाआवास अभियान राबविले जात आहे. घरकुलासाठी १.२० लाखाचे अनुदान,  नरेगाअंतर्गत ९० दिवसाचा रोजगार, शौचालय बांधकामासाठी १२ हजाराचे अनुदान आणि घरकुल पूर्ण झाल्यानंतर नळ, विद्युत व गॅस जोडणी देण्यात येणार आहे. या अभियानाची व्यापक जनजागृती व्हावी याकरीता जिल्हास्तरावर कार्यशाळा पार पडली. आता तालुकास्तरावर ११ डिसेंबरपर्यंत आमदारांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर १२ डिसेंबरपासून गावस्तरावर जनजागृती करण्यात येणार आहे.
 
विविध योजनेंतर्गतची ग्रामीण भागातील अपूर्ण घरकुले पूर्ण करणे, घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे यासह अन्य उद्देश यशस्वी करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत महाआवास योजना राबविण्यात येत आहे. तालुकास्तर आणि त्यानंतर गावपातळीवर कार्यशाळा घेऊन याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
- डॉ. विनोद वानखेडे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वाशिम

Web Title: Alarm of 'Maha Awas Yojana' from taluka wise workshop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.